रेमो डिसुझाला हाॅस्पिटलमधून मिळाली सुट्टी

0

मुंबई ः  कोरिओग्राफर रेमो डिसुझाला कोकिलाबेन हाॅस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रेमोला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्याची तब्येत व्यवस्थित झाल्याने त्याला सुट्टी मिळाली आहे.

इन्स्टाग्रामवरून रेमोने आपण बरा झाल्याचे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. तसेच त्यांने चाहत्यांचे आभारही मानले आहेत.सोशल मीडियावरून रेमोने एक व्हिडीओ शेअर करत आपण बरा झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. व्हिडीओमध्ये तो बरा झाल्याचे दिसत आहे.

रेमो हाॅस्पिटलमधून बरा होऊन घरी परतल्यावर त्याचे छानपैकी स्वागत करण्यात आले. या व्हिडीओमध्ये मागे गणरायाचे गाणे सुरू आहे. तसेच रेमो डान्स करून आपण बरा झाल्याचे सांगतो आहेत. रोमेने पोस्टवर असेल लिहिले आहे की, ”सर्वांना प्रेमासाठी आणि दिलेल्या आशिवार्दासाठी मनापासून धन्यवाद. माझ्या शेकडो मित्रांचे आभार.”

Leave A Reply

Your email address will not be published.