मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 1 जून लॉकडाऊन लागू आहे. मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे 1 जून नंतर निर्बन्ध शिथिल होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. अश्यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जातील असे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 10 टक्क्यांपेक्षा कमी संसर्ग दर असणाऱ्या जिल्ह्यात लॉकडाऊमध्ये काही सवलती देण्याचे संकेत दर्शवले आहेत.
ते म्हणाले, जर बेड्सची संख्या 50 टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्यावेळी निर्बंध कमी करण्याची पावले उचलली जातील.
मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
राज्याचे साथ रोग नियंत्रण अधिकारी प्रदीप आवटे म्हणाले, या पुढे महाराष्ट्रात संसर्ग दर कमी होत जाण्याची शक्यता आहे. सध्याचे निर्बंध हे केवळ ‘पॉज’ बटनसारखे आहेत. आपण दीर्घकाळ बंद ठेवल्यास एकत्रित हानी अधिक होण्याची भीती आहे.
संसर्ग कमी झाल्यावर आपण हळुवारपणे आणि काळजीपूर्वक व्यवहार खुले केले पाहिजेत, असे ते म्हणाल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाने दिले आहे.