हैदराबाद ः हैदराबाद महापालिकेचा निवडणुकीतील १५० वाॅर्ड्समधील १६६ जांगाचे निकाल लागलेले आहेत. त्यात टीआरएसला ५६ जागा, भाजपाला ४९ तर, एमआयएमला ४३ आणि काॅंग्रेसला फक्त दोन जागा मिळालेल्या आहेत. टीआरएसबरोबर भाजपाची पुन्हा सरशी, तर एमआयएम पिछाडीवर आहे. अशामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांनी हैदराबाद जनतेचे आणि भाजपा कार्यकर्त्यांचा आभार मानले आहेत.
हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास आहे. १५० वाॅर्ड्ससाठी ११२२ निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचे खास वैशिष्ट्य हे की, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत केंद्रातील भाजपाने उडी घेतलेली होती. असदुद्दीन ओवेसी, चंद्रशेखर राव आणि भाजपा यांची तिरंगी लढत सुरू आहे.
३० ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना केली आहे. प्रत्येक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मागील वेळी टीआरएसने महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केलेली होती.