निवृत्त प्रचार्यांची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

0

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील औंध भागात घडली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

गजनान वैजनाथ परिशवाड (60) असे आत्महत्या केलेल्या निवृत्त प्राचार्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजनान हे एका कॉलेजमध्ये प्राचार्य होते. ते निवृत्त झाले होते. सध्या ते औंध येथील नागनाथ रोडवर असणाऱ्या हर्ष पॅराडाईज इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होते. त्यांना दोन मुले असून, ते परदेशात असतात.

दोन दिवसापूर्वी गजनान यांनी रात्री तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. चतुःश्रुगी पोलोसानी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत गजनान यांची भाची यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे. गजनान यांच्याकडे सुसाईड नोट सापडलेली नाही. तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.