भुल थापांना रिक्षा चालक मालक बळी पडणार नाही : बाबा कांबळे

दिवाळी संपताच तीव्र आंदोलन करण्याचा सर्वानुमते निर्णय

0

पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून रिक्षा चालकांच्या महामंडळचा प्रश्न अधांतरी राहिला आहे.  राजकीय फायदा मिळविण्यासाठी महामंडळ करण्याची दिशाभुल केली जात आहे. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवर ट्रक टेम्पो बस आणि रिक्षाचे एकत्र जाहीर केलेले महामंडळ हे फसवे असून यातून रिक्षाचालकांचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे अशा फसव्या घोषणांना आम्ही बळी पडणार नाही. येणाऱ्या मुंबई, पुणे, पनवेल, नवी मुंबई, कोल्हापूर सह होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसायला लागतील. रिक्षा चालकांच्या भविष्याविषयी आता आरपारची लढाई सुरू करणार असून दिवाळीनंतर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा *महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व रिक्षा ब्रिगेडच्या वतीने गणपती पुणे रत्नागिरी कोकण येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप झाला. अध्यक्षीय भाषण करताना बाबा कांबळे यांनी हा इशारा दिला.

बाबा कांबळे म्हणाले की, 2007 मध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्यामुळे बांधकाम मजूर आणि घरेलू कामगार महिलांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आले. परंतु बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी मंडळ मध्ये निधी असल्यामुळे आजचे मंडळ बांधकामांना लाभ देत आहे. परंतु घरेलू कामगार मंडळाचे कामकाज मात्र निधीअभावी रखडले आहे. अशीच परिस्थिती रिक्षाचालक मालकाच्या कल्याणकारी मंडळाचे होईल. जरी मंडळ कामगार खात्याच्या अंतर्गत झालं आणि या मंडळास कायमस्वरूपी निधीची तरतूद करण्यात आली नाही तर मात्र त्यांची घोर निराशा आणि फसवणूक होईल. रिक्षाचालक मालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. 

यावेळी  रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब ढवळे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत  पुणे शहराध्यक्ष शफिकभाई पटेल उपाध्यक्ष अरशद अन्सारी, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष लक्ष्मण शेलार,उपाध्यक्ष  विजय ढगारे , संजय दौंडकर,जाफरभाई शेख, अनिल शिरसाट, खलील मकानदार, रवींद्र लंके,अजय साळवे,प्रदीप अहीर, सिद्धार्थ साबळे, अमित साळवे,किरण एरंडे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, कष्टकरी जनता महिला आघाडी अध्यक्षा अनिता सावळे, उपाध्यक्ष मधुरा डांगे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रमदे महापालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये रिक्षाचालकांना आश्वासन देऊन थापा मारण्याचे काम सुरू आहे. त्याकडे लक्ष न दिल्यास मोठी फसवणूक होईल. त्यामुळे रिक्षा चालकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे.

रिक्षाचालकांना घरकुल मिळाले पाहिजे. रिक्षा हकीम व खटवा समितीच्या सूत्रानुसार रिक्षाचे भाडे वाड झाली पाहिजे. गेल्या चार वर्षांमध्ये रिक्षाची भाव वाढ झाली नाही. पुण्यामध्ये अत्यंत तुटपुंजी भाववाढ दिली आहे. त्यामुळे भाववाढ मिळाले पाहिजे. असे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडविण्याची आता हीच योग्य वेळ आहे. रिक्षाचालकांच्या हितासाठी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक मालकांनी आणि सर्व संघटनांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन देखील यावेळी बाबा कांबळे यांनी केले. यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून महाराष्ट्रातील सर्व संघटनांना एकत्र करण्याचे प्रयत्न देखील करणार असल्याच्या बाबा कांबळे म्हणाले.

स्वागत कसले हि लढण्याची वेळ आहे काही संघटना हाताशी  धरून चुकीचे निर्णय लादले जात आहेत यातून रिक्षा चकलांचे  खरच हित होणार असेलतर मलाही समजून सांगा,कोठेही चर्चा साठी तयारी आहे,अन्यथा मला साथ दया रिक्षा मी फेरीवाले, बांधकाम मजूर, घरकाम महिलांसाठी काम करतो त्यांच्या साठी कायदे  करून घेतले ,  चालक मालकांचे नुष्कान होऊदेणार नाही,तामिळनाडू मदे फसलेले कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या माथी मारू नाका, अन्यथा रिक्षा चालक योग्य दखल घेतील असे बाबा कांबळे, म्हणाले.

कोविड19  काळात रिक्षाचालकांनी मोफत सेवा दिली यात त्यांच्या परिवारातील व्यक्ती देखील   तुमच्या सोबत होत्या यामुळे कोविड युद्ध परिवार म्हणून यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.