नवी दिल्ली ः मध्यप्रदेशात युवक काॅंग्रेसकडून भाजपाच्या नेत्याचीच सरचिटणीसपदी निवड केली असल्याने काॅंग्रेसला चांगलेच टीकेला सामोरे जावे लागत आहे. तूर्तास ही चूक तातडीने दुरुस्त केली. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. काॅंग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्याची युवक काॅंग्रेस सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आली होती.
या नेत्याचे हर्षित सिंघई असे नाव आहे. ज्यावेळी त्यांना शुभेच्छ येऊ लागल्या तेव्हा त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. मार्च महिन्यात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत या नेत्याने काॅंग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. असे असले तरी काॅंग्रेसने अजूनही आपल्या पदाधिकाऱ्यांची यादी अपडेट केलेली नव्हती. त्यामुळे काॅंग्रेसला टिकेला सामोरे जावे लागत आहे.
याप्रकारावर हर्षित सिंघई यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, “जेव्हा मी सिंधियांसोबत भाजपात प्रवेश केला तेव्हा काँग्रेसला माझं नाव निवडणुकीतून वगळण्याची विनंती केली होती. पण त्यांनी तसं काही केलं नाही. मी परत फोन केला तेव्हा त्यांनी ईमेल करत पक्ष सोडण्याची कारणं देण्यास सांगितलं. मी कलमनाथ आणि राहुल गांधी यांना लिहिलं होतं. युथ काँग्रेस संपूर्ण मध्य प्रदेशात हेच करत आहे. जे पक्षात नाहीत त्यांनी निवडून आणत आहे”, अशी टीका करत सिंघई यांनी काॅंग्रेस पक्ष माझी जाणीवपूर्वक बदनामी करत आहे, असाही आरोप त्यांनी केला.