पुण्यातील प्रसिद्ध शारदा गणपतीच्या मंदिरात चोरी, लाखोचे दागिने चोरीला

0
पुण्यातील मानाचा गणपती पैकी एक असणाऱ्या प्रसिद्ध शारदा गणपतीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी झालीय. अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करत वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.  शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात अशा प्रकारे चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पुण्याच्या मध्यवस्तीतील मंडई परिसरात शारदा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा ही आहे. असे असतानाही अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करतात तब्बल वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. हा परिसर सातत्याने गजबजलेला असतो. तरीदेखील या मंदिरात अशाप्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलीस आणि गुन्हे शाखेचे प्रतीके घटनास्थळी दाखल झाली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सध्या सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी याच मंदिरातील तब्बल 50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते. सोबतच एक नेकलेसही चोरट्यांनी चोरून नेला होता. या सर्व घटनेमुळे तेव्हा एकच खळबळ उडाली होती. 
Leave A Reply

Your email address will not be published.