नसरापूरच्या सरपंचपदी रोहीणी शेटे तर उपसरपंचपदी गणेश दळवी बिनविरोध

0
भोर (माणिक पवार) : भोर वेल्हा तालुक्याला जोडणारी महत्वाची बाजारपेठ असलेल्या नसरापूरच्या सरपंचपदी रोहीणी अनिल शेटे तर उपसरपंचपदी गणेश सुरेश दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नसरापूर ( ता. भोर ) येथील सरपंच उपसरपंच निवड पार पडली या अगोदर झालेल्या सदस्य निवडणुकीत येथील नसरापूर विकास पँनलला अकरा पैकी दहा जागा मिळाल्याने नसरापूर विकास पँनलचे निर्विवाद वर्चस्व आहे तर एक जागी अपक्ष महिला विजयी झाली आहे सरपंच आरक्षण सर्वसाधारण महिलेला जाहीर झाल्याने सरपंच कोण होते याकडे गावचे लक्ष लागले होते विकास पँनलच्या सदस्यांनी व मार्गदर्शकांनी एकत्र बैठक घेऊन सरपंच व उपसरपंचपदा बाबत सर्वानुमते निर्णय घेतला व त्यानुसार आजच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी रोहीणी शेटे यांचा तर उपसरपंचपदासाठी गणेश दळवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला दोन्ही अर्ज वैध ठरल्याने निवडणुक निर्णय अधिकारी ए यु हजारे यांनी सरपंच म्हणुन रोहीणी शेटे व उपसरपंच म्हणुन गणेश दळवी यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक विजय कुलकर्णी तलाठी जे डी बरकडे व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदिप कदम,नामदेव चव्हाण,सुधीर वाल्हेकर, इरफान मुलाणी, सपना झोरे,उषा कदम,श्रध्दा हाडके,अश्विनी कांबळे,मेघा लष्कर.उपस्थित होते.

निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वांचित सरपंच व उपसरपंचाचा सत्कार येथील भैरवनाथ मंदिरात करण्यात आला यावेळी यशवंत कदम,माजी सरपंच भरत शेटे, माजी उपसरपंच शंकर शेटे,सुरेश दळवी, ज्ञानेश्वर झोरे, राजेंद्र वाल्हेकर,महेश दळवी,उत्तम निकम,रमेश शेटे,सुधीर शेडगे, ज्ञानोबा वाल्हेकर,अनिल शेटे यांच्यासह तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरपंच रोहीणी शेटे यांनी सर्वांचे अभार मानुन सर्व सदस्य व ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर उपसरपंच गणेश दळवी यांनी दिलेल्या संधीचा गावच्या विकासासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.