चिंचवड डांगे चौक रस्त्यावर कारमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

0

पिंपरी : थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर एका कार मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

महेश लक्ष्मण पायगुडे (44, रा. गोखले वृंदावन, राघवेंद्र मठाजवळ, थेरगाव) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील पदमजी पेपर मिल समोर एका कार मध्ये महेश पायगुडे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महेश मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा फोनही लागत नव्हता. त्यांच्या घरच्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना महेश बेपत्ता असल्याची माहिती दिली नाही. मागील दोन ते तीन दिवसांपासून महेशचा मृतदेह गाडीमध्ये आहे.

महेश यांची आई मंदाकिनी लक्ष्मण पायगुडे (65) यांनी पोलिसांना माहिती दिली की, महेश यांना दारूचे व्यसन होते. त्यांची एक मुलगी मागील चार महिन्यांपूर्वी एका दुर्धर आजाराने मयत झाली. त्यांची पत्नी गावी आहे. महेश यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.