‘लस महोत्सव’च्या नावाखाली सत्ताधारी भाजपाकडून नागरिकांची दिशाभूल : विलास लांडे यांची टीका

0

पिंपरी : कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही . लसीअभावी शहरात अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘ लस महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे . मात्र पुरेशा लसीचा साठा नसताना हा महोत्सव करणार कसा ? असा सवाल माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित केला आहे . तर लसीचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे . तसेच पार्थ दादा पवार युवा मंचच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मदत करणार असल्याची माहिती माजी आमदार लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली .

माजी आमदार लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की , राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद आहेत . करोनाच्या गंभीर संकटातही लसीचे राजकारण करून संकटाला महोत्सव म्हणून साजरे करणा – या केंद्रातील भाजप सरकार व पिंपरी चिंचवड महापालिका सत्ताधाऱ्यांचा निषेध केला पाहिजे .

‘ लस महोत्सव’च्या नावाखाली सत्ताधारी भाजप’ संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रचंड वेगाने वाढत आहे . तो रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही . राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे . पण केंद्र सरकारकडून पिंपरी चिंचवडला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही . लस नसल्याने मधल्या काळात शहरात लसीकरण मोहीम ठप्प झाली होती . आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला पुरेशी लस पुरवण्याऐवजी पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांना मोफत लस पुरवत आहेत . राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही महाराष्ट्राला व शहराला मुबलक लसीचा पुरवठा केला जात नाही , अशी खंत माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केली . ‘ महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रूग्णसंख्या व लोकसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपशासीत राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे .

करोनाने मोठ्या प्रमाणात रूग्णांचा मृत्यू होत असताना लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करत आहे . हे अत्यंत दुर्दैवी व बेजबाबदार आहे . कुठल्याही संकटात जनतेला वा – यावर सोडून संकटाचा सोहळा साजरा करण्याचा रोग केंद्रासह पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जडला आहे , ‘ अशा संतप्त शब्दांत पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर माजी आमदार लांडे टीका केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.