ठाणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सत्ताधारी पक्षाच्या स्विकृत नगरसेवकास 2 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी 57 वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. सिद्धेश्वर मोगलअप्पा कामुर्ती (62, स्वीकृत नगरसेवक, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका) असे त्याचे नाव आहे. त्याने 2 कोटी रुपये मागितले होते. तडजोड अंती 50 लाख देण्याचे ठरले. ही मागणी दि. 4/10/2021 रोजी झाली. पण सापळा आज रचण्यात आला आणि तो यशस्वी झाला आहे.
तक्रारदार यांचे पद्मानगर भाजी मार्केट भिवंडी येथे दुकान असून, तेथे सुमारे 100 दुकाने आहेत. सदर दुकाने अनाधिकृत असून, ती तोडण्याबाबत लोकसेवक कामुर्ती यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे अर्ज केला होता. सदर अर्ज मागे घेण्यात करिता तक्रारदार यांचेकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यांना 2 कोटी रुपये देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी दि. 30/09/2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ठाणे) येथे येवुन लेखी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 4/10/2021 रोजी केलेल्या पडताळणी मध्ये आरोपीत लोकसेवक यांनी तडजोडअंती 50 लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला आज (दि. 13/10/2021) रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध सापळा कारवाई करून त्यास तक्रारदार यांच्याकडून 50 लाख लाच घेताना पकडण्यात आले.
Thane ACB SP पंजाबराव उगले, Addl SP अनिल घेरडीकर यांच्या मारदर्शनाखाली DySp माया मोरे (DySp Maya More), मनोज प्रजापती ( पोलीस निरीक्षक, ACB Thane), पो.हवा. तारी, पो.ना. भवारी, पो.ना. तडवी, म.पो.ना.ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे.