मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपेच पाच अधिकृत उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे आता निवडणूक होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यात दहा जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दहा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज भरला होता. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप ची तयारी करण्यात आल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात होते. सहाही उमेदवार जिंकतील असा दावा नेत्यांकडून केला जात होता. पण सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.