सई मांजरेकर दिसणार ‘मेजर’ चित्रपटात

0

मुंबई : ‘दंबग ३ मधील सई मांजरेकर कुठे गायब झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर मुलगी एक चित्रपट कुठे गायब झाली. तर, सई कुठे गायब झालेली नाही तर, तीने दुसरा एक चित्रपट नुकताच पूर्ण केला आहे. सईचा आपल्या करिअरमधील दुसरा चित्रपट आहे. वडील सलमान आणि आयुषच्या चित्रपटात व्यस्त आहे, दुसरीकडे मुलीने दुसरा चित्रपट पूर्णही करून टाकला.

सई तेलगू आणि हिंदी भाषेत ‘मेजर’ नावाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मुंबई झालेल्या २६/११ आतंकवादी हल्ल्यात एनसीजी कमांडोज यांच्यावर आधारित आहे. एनसीजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन पण होते आणि शेंकडों लोकांना वाचवलं होतं. त्यात त्यांना जीव गमावावा लागला होता. सईला मुंबई घटनेची चांगलीच लक्षात आहे.

सई सांगते की, “या घटनेवेळी १०-११ वर्षांची होती. ते चित्र टीव्हीवर पाहत होते. ती अशी वेळ होती मला काही कळत नव्हतं. तिथं काही हल्ले होत आहे. आवाज येत होता आणि किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज येत होता. हे सगळं पाहून मी देवाकडे प्रार्थना करत होते. हे सगळं माझ्या समजण्याबाहेरचं होतं. अशा आशयाच्या चित्रपटात मला संधी मिळाली. मी या प्रोजेक्टमध्ये पूर्ण झोकून देऊन काम केले आहे. उन्नीकृष्णन यांचं काम समाजापर्यंत पोहोचविण गरजेचं आहे. कारण, तो त्यांचा हक्क आहे.

हा तेलगू चित्रपट ‘मेजर’ सुपरस्टार महेश बाबू बनवत आहेत. शहीद एनसीजी कमांडो संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका आदीवी सेश आणि या चित्रपटात सई मांजरेकर यांच्यासोबत शोभिता धुलिपाला हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सईने हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात साइन केलेला आहे. जवळपास हा चित्रपट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.