पिंपरी : उच्चभ्रू सोसायटी असणाऱ्या लोढा बेलमांडो या सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या पुणेरी फ्रेश मार्ट या दुकानावर छापा टाकून बनावट वस्तू विक्रीचा प्रकार समोर आणला आहे.
दुकानातुन रोजच्या वापरातील बनावट टॉलेट क्लिनिक, हारपिक बाटल्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कॉपीराईट ऍक्ट१९७७चे कलम६३,६५व ट्रेडमार्क ऍक्ट१९९९चे कलम१०३,१०४ प्रमाणे अशोककुमार आसाराम चौधरी (३०,रा.लोढा वसाहत,टॉवर११,गहुंजे ता. मावळ,पुणे) या दुकान मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. ब्रॅण्ड प्रोटेक्शन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड,नवी दिल्ली या कंपनीचे प्रतिनिधी अशफारुद्दीन फोउजुद्दीन इनामदार (वय ३६ रा.रहाटणी,पिंपरी ) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,गहुंजे परिसरातील लोढा वसाहती शेजारी पुणेरी फ्रेश मार्ट या दुकानात ४४३४रुपये किंमतीच्या१लिटरच्या१६बाटल्या, ६५०मिलिच्या ८बाटल्या व २००मिलिच्या २३ बाटल्यावर रेकीट बेंचीझर कंपनीचा स्टिकर लावून हारपिक बाटल्यांचा बनावट माल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी अशोक कुमार आसाराम चौधरी हा ग्राहकांना दुकानातून खुलेआम पणे विक्री करत होता.
याविषयी कंपनीचे प्रतिनिधी यांना माहिती मिळाली असता त्यांनी देहूरोड पोलिसांना माहिती देऊन पुणेरी फ्रेश मार्ट दुकानावर छापा टाकला आणि बनावट माल जप्त करून बनावट माल विक्री करणाऱ्या दुकान मालकावर गुन्हा दाखल केला.