संजय पांडे बृहन्मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त; तर हेमंत नगराळे यांची बदली

0

मुंबई : बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली असून बृहन्मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बदलीच्या ठिकाणी तात्काळ रूजू व्हावे आणि शासनास रूजू अहवाल सादर करावा असा आदेश काढण्यात आलेला आहे. शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी हा आदेश आज (सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022) काढला आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22न च्या पोटकलम (2) मधील तरतुदींनुसार अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय पांडे यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर मुंबईचे पोलिस आयुक्त  हेमंत नगराळे यांची पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई ते व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. बदलीचे आदेश आज (सोमवारी) निर्गमित करण्यात आलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.