मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं 4 ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळं राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे.
पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं रविवारी तब्बल ९ तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली.
Accused Sanjay Raut is remanded to ED custody till August 4. That will suffice the object of investigation.#SanjayRaut #PatraChawlLandScam
— Live Law (@LiveLawIndia) August 1, 2022
कोर्टात युक्तीवादादरम्यान ईडीनं संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी वकिलांनी म्हटलं, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी एक रुपयाचीही गुंतवणूक केलेली नाही. पण त्यांना ११२ कोटी रुपये मिळाले. चौकशीतून हे समोर आलं आहे की, यांपैकी १.६ कोटी रुपये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले.