मुंबई ः “शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण, मला अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. शरद पवारांनी स्वतः हे वृत्त नाकारलं आहे. ते महाराष्ट्राते खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. यूपीएच्या अध्यक्षपदाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. ही गोष्ट शरद पवारांनी स्वतः सांगितली असती, ते चर्चा करणं योग्य ठरली असती”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
राऊत पुढे म्हणाले की,”काॅंग्रेस पक्ष मोठा आहे. मात्र लोकसभेत विरोधी पक्षाचं पद ते मिळवू शकले नाहीत, हे सत्य आहे. आपल्याला एकत्र येऊन यूपीएला मजबूत करावं लागेल. महाविकास आघाडी झाली तशी केंद्रातही आघाडी होऊ शकते का? त्याचं नेतृत्व कोण करणार? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यावरही निर्णय होतील”, असेही राऊत यांनी सांगितले.
यूपीएचे अध्यक्ष शरद पवार… नेमकं काय आहे राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण जाणून घ्या : जनतेचं लक्ष हटविणासाठी अशा बातम्या पेरल्या