पिंपरी : संजय राऊतांनी मला पत्र पाठवले पण सुरक्षेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय गेत नाही. त्या कामासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, समिती आहे. त्यांचे पत्र समितीकडे जाईल आणि आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. यात आम्ही कधीही राजकारण करीत नाही. विनाकारण रोज आरोप ते करीत आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्याकडून एवढे आरोप होत आहेत ते बिनडोक आरोप एवढे आहेत की, आता त्याला काय उत्तर द्यावे? असा प्रतिसवालही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमासमोर केला. फडणवीस हे चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी वाकड येथे आले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊतांचे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे हा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचा विषय राजकारणाशी जोडणे चूक आहे. संजय राऊत असो की, कुणीही कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता निश्चित आहे की, त्यांना सुरक्षा द्यावी का हे काम इंटलिजन्स डिपार्टमेंटचे आणि समितीचे काम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुरक्षा देण्याचे काम करीत नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊतांचे पत्र कमिटीकडे जाईल आणि आवश्यक असेल तर सुरक्षा पुरवली जाईल. यात आम्ही कधीही राजकारण करीत नाही. विनाकारण रोज आरोप केले जात आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्याकडून एवढे आरोप होत आहेत. बिनडोक आरोप एवढे आहेत की, आता त्याला काय उत्तर द्यावे?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत सनसनाटी निर्माण करीत आहे. त्याने काहीही फायदा होत नाही. रोज खोटे बोलून सहानुभुती मिळत नाही. लोकांना लक्षात येते की, त्यांचे काय चालले आहे. चुकीचे आरोप लावल्याबद्दल कुणीतरी मागणी करीत आहेच. गंभीर विषय गंभीरच ठेवायला हवा. समिती सुरक्षेबाबत योग्य निर्णय करेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. त्यांचा तो प्रयत्न आहे. ते भिमाशंकर ज्योतिर्लिंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. कामाख्य मंदीर महाराष्ट्रात असल्याची मी जाहीरात दिली तर ते महाराष्ट्रात असेलच असे नाही. त्यांच्याकडे काहीही बोलण्यासारखे नाही.