महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत संकेत चव्हाण, प्रसाद सस्ते विजयी

पुनावळेत रंगलेल्या स्पर्धेस कुस्ती शौकीनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड  कुस्तीगीर संघ आयोजित व वस्ताद आनंदराव बाजीराव बोरगे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड स्पर्धेत खुला गट माती विभागात संकेत चव्हाण (निगडी) यांने प्रतिस्पर्धी समाधान दगडे याचा दुहेरी डाव टाकत पराभव करून तर गादी विभागात प्रसाद सस्ते (मोशी) याने शेखर शिंदे याचावर मात करून विजय मिळवला.

पुनावळे येथील वै.ह.भ.प. गणपत दामोदर रानवडे गुरुजी क्रीडांगणावर स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी माजी खासदार विदुराजी तथा नानासाहेब विठोबा नवले, पिंपरी चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, उपाध्यक्ष विशाल कलाटे, हिंद केसरी अमोल बराटे, भारत केसरी विजय गावडे, विजय बराटे, खजिनदार दिलीप बालवडकर, खंडू वाळुंज, शंकर कंधारे,  युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी अजय लांडगे, राष्ट्रीय कुस्तीगीर अभिषेक फुगे यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले.
यानंतर हनुमंत गावडे, पै. रत्नेश बोरगे, श्रीधर वाल्हेकर, नाना काटे, वस्ताद सुरेश चव्हाण, विशाल आप्पा कलाटे आदी मान्यवरांच्या हस्ते वस्ताद ताराचंद भाऊसाहेब कलापुरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पै. रत्नेश बोरगे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयूर कलाटे, शेखर ओव्हाळ तसेच नवनाथ नढे, पै. संतोष माचुत्रे, विजय बराटे, पै. खंडू वाळुंज, राहुल काटे, विजय दर्शले, किरण बोरगे, बाळासाहेब ढवळे, गुलाब जाधव, रोहिदास बोरगे आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे – गादी विभाग कुमार गट – वजन गट ४५ कि. ओम नखाते (वि.) – सारंग बोराडे, ४८ कि. सोहम साळुंखे (वि) – भैरव नखाते, ५१ कि. ओंकार सुतार (वि) – साजिद मुलानी, ५५ कि. श्याम कदम (वि) – वेदांत जाधव, ६० कि. अजिंक्य माचुत्रे (वि) – चेतन हिप्परकर, ६५ कि. कुणाल कस्पटे (वि) – नकुल भालसिंग, ७१ कि. साहिल गायकवाड (वि) – विश्वजीत कोंडे, ८० कि. साहिल नखाते (वि) – कौस्तुभ जगताप, ९२ कि. पृथ्वीराज नढे (वि) – स्वराज काळभोर, १०० कि. शंतनु भोजने (वि) – गौरव वाघेरे; खुला गट गादी विभाग – ५७ किलो श्री जाधव (वि) – रुद्र वाळुंजकर, ६१ किलो योगेश्वर तापकीर (वि) – साहिल फुगे, ६५ किलो महेश जाधव  (वि) – केदार लांडगे, ७० किलो वरूण कांचन  (वि) – स्वप्निल सकुंडे, ७४ किलो परशुराम कॅम्प (वि) – अर्जुन कापसे, ७९ किलो सौरभ कामथे  (वि) – विशाल कोळी, ८६ किलो पवन माने (वि) – सौरभ शिंगाडे, ९२ किलो सौरव जाधव (वि) – निरंजन बालवडकर, ९७ किलो अजिंक्य कुदळे (वि) – शुभम गवळी, ८६ ते १२५ किलो महाराष्ट्र केसरी गट प्रसाद सस्ते (वि) –  शेखर शिंदे;

माती विभाग ५७ किलो – ऋतिक नखाते  (वि) – सुनील चव्हाण, ६१ किलो संकेत माने (वि) – विनायक नाईक, ६५ किलो जय वाळके (वि) – यश सहाणे, ७० किलो अनिकेत लांडे (वि) – हर्षद पालवे, ७४ किलो जतीन कांबळे (वि) – शुभम घाडगे, ७९ किलो रवींद्र गोरड (वि) – अजिंक्य सांडभोर, ८६ किलो शेखर लोखंडे (वि) – सुरज देवकर, ९२ कि. कानिफनाथ काटे (वि) – वैभव कांचन, ९७ कि. संकेत घाडगे (वि) – शिवतेज शितोळे, १०० कि. संकेत चव्हाण (वि) – समाधान दगडे.

पंच म्हणून विजय कुटे, बाळासाहेब काळजे, सचिन खांदवे, निलेश मारणे, विक्रम पवळे, पप्पू काळेकर, संजय दाभाडे, ज्ञानेश्वरी लोखंडे, अमित म्हस्के, भानुदास घारे, वाबळे सर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन बाबाजी निम्हण, सुरेश रानवडे, राहुल काटे यांनी तर आभार संतोष माचुत्रे यांनी मानले. स्पर्धेचे आयोजन पै. रत्नेशदादा बोरगे स्पोर्ट्स फाउंडेशनने केले होते. स्पर्धेस पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.