पिंपरी : छोटा रावण नावाच्या पाहिजे असलेल्या गुंडाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याला गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सरफराज शेख उर्फ छोटा रावण, (वय 25, रा.कासरवाडी) याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बुधवारी अटक केले आहे.आरोपी छोटा रावण हा चार गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.
2021 मधील दरोड्याचा गुन्हा व 2018 मधील मारहाणीचा गुन्ह्यामध्ये तो पिंपरी पोलिस ठाण्याला पाहिजे होता.2022 मधील मारहानीच्या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे होता.तसेच 2020 मधील कार चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो देहूरोड पोलीस ठाण्याला पाहिजे होता.