‘या’ तारखेला होणार सरपंच आणि उपसरपंच निवड

0

पुणे : जिल्ह्यातील 4 तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवडीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी ही निवड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या तालुक्यांमधील 269 ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

9 आणि 10 फेब्रवारी रोजी या निवडी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार होत्या. परंतु निवडणूक निकालानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सरपंच आरक्षणाला काही गावांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. याबाबत राज्यभरातून सुमारे 35 आव्हान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नव्यानं सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता. या आदेशानुसार पुण्याचे जिल्हाधिकरी डॉ. राजेश देशमुख यांनी 9 फेब्रुवारी रोजी यावर सुनावणी घेतली होती.

बारामती तालुक्यातील निंबूत, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, मावळ तालुक्यातील परंदवडी, आणि खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, नाणेकरवाडी आणि बिरदवाडी या गावांमधील काही ग्रामस्थांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. या 4 तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडींना स्थगिती मिळाली होती.

पुणे जिल्ह्यातील 746 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारी रोजी झाल्या होत्या. या निवडणुकींचे निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर केले गेले होते. यानंतर 29 जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.