मुंबई : राज्यात १४,२३४ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत सरपंच आरक्षणाचा महत्वाच्या निर्णयात सरकारने बदल केला आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ८ जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. मात्र आता जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे नंतर कोणते आरक्षण पडणार यामुळे नक्की कोणता निर्णय घ्यायचा या संभ्रमात अनेक इच्छुक पडले आहेत.