मुंबई : कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद होत्या, त्यामुळे शाळा सुरु नसल्याने फी भरणार नसल्याची याचिका पालकांनी दाखल केली होती. यावर लॉक डाऊनच्या काळातील शाळांची फी भरावीच लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
पालकांनी 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात जेवढी फी भरली, तेवढीच फी 2020-21 या शैक्षणिक वर्षात शाळांकडे जमा करावी, असा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे पालकांना मोठा धक्का बसला आहे.
लॉकडाऊन काळात नोकरी-व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे या अवधीत शाळांच्या शुल्कमाफीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती विविध याचिकांद्वारे करण्यात आली होती. राजस्थानमधील विद्या भवन सोसायटी, सवाई मानसिंग विद्यालयाची व्यवस्थापन समिती, गांधी सेवा सदन आणि सोसायटी ऑफ कॅथलिक एज्युकेशन इन्स्टिटय़ुशन्स यांनी याचिका दाखल केल्या होत्या.