मुंबई : राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी तर काही ठिकाणी पुन्हा वाढत असताना पालक व विद्यार्थ्यांच्या मनात अद्यापही शाळांतील उपस्थितीविषयी धास्ती आहे.
विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी व पालकांची मानसिकता पाहता पहिली ते चौथीच्या शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरूच करू नयेत असे पालकांना वाटत आहे
कोरोनाचा मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रादुर्भाव पाहता मुंबई स्थानिक म्हणजेच महापालिका प्रशासन व आयुक्तांनी अद्याप शाळाचे कोणतेच वर्ग सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही.
पहिली ते चौथीचे विद्यार्थी तर अधिक संवेदनशील असून त्यांच्या सुरक्षेची अधिकाधिक काळजी घ्यावी लागणार असल्याने या क्षेत्रातील या वर्गांच्या शाळा सुरु करण्यास परवानगी मिळणे यंदाच्या शैक्षणिक वर्षात तरी कठीणच असल्याचे मत काही अधिकारी व्यक्त करत आहेत.