पुणे : राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट खुपच वाढला आहे. एकंदरीत विचार करून सर्वानुमते पुण्यातील शाळा आणखी किमान 7 दिवस सुरू होणार नाहीत असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते कोरोना आढवा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे पुण्यातील शाळा आणखी किमान 7 दिवस तर सुरू होणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या कमी-कमी होत आहे. मात्र, पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आणखी काही दिवस पुण्यातील कोरोनाची संख्या वाढतच राहणार आहेत. किमान 8-10 दिवस रूग्णांची संख्या वाढत राहणार आहे असं तज्ञांनी सांगितलं आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढत चालला आहे.
कोरोना विषयक आढावा बैठकीस शहरातील आमदार, दोन्ही महापालिकेचे महापौर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शाळा आणखी 7 दिवस तरी सुरू होणार नाहीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विनामास्क फिरणार्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लसीकरणावर देखील जास्तीत जास्त भर देण्यात येत आहे. त्याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आला आहे. कोविड मुक्त गाव अभियान सुरू केलं असून त्यामध्ये 1385 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे.