भाजपच्या नेत्यांना केंद्राची सुरक्षा

0

मुंबई : राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षाव्यवस्था कमी किंवा काढून घेण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या नेत्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.

राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशिष शेलार आणि भाजपच्या अन्य काही नेत्यांची सुरक्षा अलीकडे एकतर कमी केली किंवा काढून घेतली होती.

राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकार अशी कपात करणार असेल तर त्यांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सीआयएसएफकडून सुरक्षा पुरविली जाईल, असे संकेत केंद्राने यानिमित्ताने दिले आहेत. राणे यांना दिलेल्या सुरक्षेत ११ जवानांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.