पिंपरी : बिबवेवाडी येथील कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणात आज पिंपरी चिंचवड महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वांनी निषेध आणि श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पिंपरी चिंचवड मधील महिला सुरक्षा विषयावर मागील चार तासांपासून अनेक महिला नगरसदस्यांनी मुद्दे मांडले आहेत. याला उत्तरादाखल महापौर माई ढोरे यांनी शहरातील महिला सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
देशासह, राज्यात, पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने उपाय योजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यात महिला अत्याचाराचे गुन्हे काही केल्या थांबत नाहीत. यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला.
आपण आयुक्तालय सुरू करण्यासाठी सर्वपरी प्रयत्न केले. आयुक्तालयास जागा दिली, इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या. असे असूनही परिस्थिती सुधारत नसेल तर त्याचा उपयोग काय. महिला सुरक्षा आणि महिला पोलिस चौकी आणि कालांतराने महिला पोलिस स्टेशन संदर्भात तत्काळ पोलिस आयुक्त यांची बैठक लावावी लागेल आदी विषयांवर चर्चा झाली आहे.