ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
एकनाथ खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती समोर आली आहे .
भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही 9 तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.
Leave A Reply

Your email address will not be published.