यशस्वी प्रक्षेपणानांतर सेन्सर फेल, उपग्रह निकामी : इस्रो

0

बेंगलोर : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दोन्ही उपग्रहांचे रविवारी सकाळी यशस्वी प्रक्षेपण झाले. पण उपग्रहांचे सेन्सर फेल झाल्यामुळे ही अंतराळ मोहीम अपयशी ठरली. इस्त्रोने हे दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत पोहोचल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आता ते निकामी ठरल्याचेही म्हटले आहे. इस्रोने या अपयशाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली आहे.

तत्पूर्वी, रविवारी सकाळी 9.18 वा. इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रातून (SDSC) आपल्या SSLV-D1 या पहिल्या स्मॉल सॅटेलाईट प्रक्षेपण यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणाद्वारे भारताने आझादीसॅट अंतराळात पाठवला आहे. यानातील 75 पेलोड्स देशभरातील 75 ग्रामीण सरकारी शाळांतील 750 विद्यार्थ्यांनी तयार केलेत. हे पेलोड्स तयार करणाऱ्या विद्यार्थीनी प्रक्षेपणावेळी श्रीहरिकोटात उपस्थित होत्या.

यानाने दोन्ही उपग्रह त्यांच्या ठराविक कक्षेत पोहोचवलेत. पण त्यानंतर उपग्रहांकडून डेटा मिळणे बंद झाले आहे. इस्रो प्रमुख प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन कंट्रोल सेंटर सातत्याने डेटा लिंक प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे. EOS02 एक अर्थ ऑब्झरव्हेशन उपग्रह आहे. तो पुढील 10 महिने अंतराळातून महत्वपूर्ण माहिती पाठवेल. 142 किलो वजनी या उपग्रहात मिड व लॉन्ग व्हेवलेन्थ इन्फ्रारेड कॅमेरा असून, त्याचे रेझोल्यूशन 6 मीटर आहे. हा उपग्रह रात्रीच्या अंधारातही टेहळणी करण्यास सक्षम आहे.

पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हीकल (PSLV) 44 मीटर उंच आहे. 2.8 मीटरचा व्यास असणाऱ्या या महाकाय रॉकेटचे 4 स्टेज आहेत. याऊलट एसएसएलव्ही 3 स्टेजचे असून, त्याचा व्यास 2 मीटर एवढा आहे. दोन्ही यानांच्या वजनातही मोठे अंतर आहे. पीएसएलव्हीचे वजन 320 टन आहे, तर एसएसएलव्हीचे वजन 120 टन आहे. पीएसएलव्ही 1750 किलो वजनाचे पेलोड्स 600 किमी उंचीवर पाठवून शकतो. तर एसएसएलव्ही 10 ते 500 किलो वजनाचे पेलोड्स 500 किमी उंचीवर अवकाशात पाठवू शकते. पीएसएलव्हीची बांधणी करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी लागतो. त्यातुलनेत एसएसएलव्ही अवघ्या 72 तासांत तयार होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.