एच३एन२ आजारावर उपचारासाठी सर्व रुग्णालयांत सुविधा उभारा; आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची अधिवेशनातून आयुक्तांना सूचना

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये एच३एन२ संसर्गाने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच वैद्यकीय विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क करत माहिती घेतली. तसेच या संसर्गाचे प्रमाण वाढू नये यासाठी अधिक दक्षता घेण्याची व सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराची सक्षम सुविधा उभारण्याची सूचना आयुक्तांना केली. त्याचप्रमाणे त्या अधिवेशनातून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाल्या असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक नियोजित करण्यात आली आहे.

शहरात एच३एनट२ संसर्गाचा पहिला बळी गेला आहे. एका ७३ वर्षीय वृद्धाचा या संसर्गाने मृत्यू झाल्याचे समोर आहे. त्यानंतर शहरात अधिक काळजी घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संसर्गावर मात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत सक्षम यंत्रणा व सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती घेतली. तसेच वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली.

त्यांनी शहरात एच३एन२ संसर्ग वाढू नये यासाठी वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये एच३एन२ संसर्गाच्या रुग्णांवर उपचारासाठी सर्व व्यवस्था उभारण्यास सांगितले. कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता तातडीने उपचार व्यवस्था निर्माण करण्यास त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक नियोजित करण्याची सूचनाही आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे. तसेच या आजाराबाबत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू नये यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी याबाबत जनजागृती करण्यासही त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे.    

Leave A Reply

Your email address will not be published.