सोलापुरच्या शिक्षकाला ‘सात कोटीं’चा पुरस्कार जाहीर

रणजितसिंह डिसले 'ग्लोबल टिचर प्राईज २०२०'चे मानकरी

0

सोलापूर ः जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक असणाऱ्या रणजितसिंह डिसले यांना जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टिचर प्राईज २०२०’ हा पुरस्कार मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी गावातील जिल्हा परिषदेतच्या शाळेत शिकविणारे रणजितसिंह यांनी मुलीच्या शिक्षणाला चालना मिळावी यासाठी क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून राज्य तसेच देशात प्रयत्न केले. त्यांच्या या कामासाठी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या पुरस्कारासाठी १४० देशांतील १२ हजारांहून अधिक शिक्षकांमधून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. ७ कोटी रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जाहील झालेल्या पुरस्काराची रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम ही अंतिम फेरीत निवड झालेल्या ९ शिक्षकांना देण्याचे रणजितसिंह यांनी घोषीत केले आहे. अशा पद्धतीतने प्रत्येक शिक्षकाला ५५ हजार डाॅलर्स मिळणार आहेत.

रणजितसिंह डिसले यावेळी म्हणाले की, ”करोना महामारीच्या काळात शिक्षण व्यवस्थेत अनेक अडथळे आले. मात्र, या कठीण काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न केले आहेत. शिक्षण देण्यात आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षक कायमच विश्वास ठेवतात. माझा विश्वास आहे की, आम्ही सर्वजण एकत्र मिळून जग बदलू शकतो.” रणजितसिंह डिसले यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ट्विट करून अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.