सात वर्षाच्या ‘रिआन’ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

0

पिंपरी : पिंपरीचिंचवड शहरातील सात वर्षाच्या मुलाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 51 किलोमीटर सायकलिंग करुन एकवेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या मुलाच्या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

रिआन देवेंद्र चव्हाण याने त्याच्या वयाच्या सातव्या वाढदिवसाच्या दिवशी 51 कि. मी. सायकलवर पुणे दर्शन सी.एम.., खडकी, लालमहाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी असे करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवला आहे.

       

रिआनचे लहानपणापासून साहसी खेळाकडे कल झुकलेला आहे. अवघ्या 3 वर्षाचा असताना सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूरलोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले नेहमीच मनात येईल तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माताडोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी टेक करत असतो.

     

रनिंग मध्ये 6 मॅरेथॉन 5 कि.मी.च्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत पिंपरी चिंचवड येथील 5 कि.मी. मॅरेथॉन 34 मिनिटात पूर्ण केलेली आहेस्पोर्ट्स फोर ऑल 2022 या अंडर 8 वर्षे वयोगटात 50 मीटर रनिंग मध्ये 3 रा नंबर पटकावून ब्रांच मेडल मिळवलेले आहे. तो केंद्रीयविद्यालय देहूरोड नंबर-1 या शाळेत दुसरीत  शिकत आहे.

   

 

रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक पदावर तर आई डॉ. अपर्णा ह्या भारतीय प्राणीसर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.