मुंबई : मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक महिला पोलीस अधिकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार तिने पवई पोलिसांकडे केली आहे.
सदर इसमाशी संबंधित अन्य दोन जणांच्या विरोधातही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्याला धमकावले व ब्लॅकमेलिंग केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातील मुख्य आरोपी औरंगाबादचा आहे. तो बॅंकेचा अधिकारी असल्याचे तो सांगतो.
सदर महिली पोलीस अधिकाऱ्याची त्याची सोशल नेटवर्क साईटवर भेट झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. आरोपींनी या महिलेचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ काढले आणि त्या आधारावर तो या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकाऊ लागला.
हे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही या तीन जणांनी सतत दिली. त्या छळाला कंटाळून सदर महिला अधिकाऱ्याने ही तक्रार दाखल केली आहे. पवई पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.