पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

0

पिंपरी : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे समाजात तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद आज सर्वत्र दिसून आले आहे.

आज पुणे दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड येथील कार्यक्रमात भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. ही शाईफेक कोणत्या संघटनेकडून करण्यात आलीय हे स्पष्ट झालेले नाही.

चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.