पुणे : भाजपने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे, पिंपरी–चिंचवडच्या शहराध्यक्षपदीशंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे. तर जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण बारामतीसाठीवासुदेव काळे आणि मावळसाठी शरद बुट्टे–पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरबावनकुळे यांनी ही नियुक्ती केली.
भाजपची राज्य कार्यकारिणी 5 मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष 15 मे आणि नंतर 20 मे पर्यंत जाहीरहोतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती केली आहे. घाटे हे माजी नगरसेवक, सभागृह नेते आहेत. कसबा विधानसभापोटनिवडणुकीसाठी ते तीव्र इच्छुक होते. पण, उमेदवारी मिळाली नव्हती. पक्षाने आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविलीआहे. पिंपरी–चिंचवडच्या शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती केली आहे.
जगताप हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत. पिंपरी महापालिकेत नगरसेवक राहिले आहेत. चिंचवड विधानसभापोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते. पण, उमेदवारी मिळाली नव्हती. पक्षाने आता त्यांच्याकडे शहराची जबाबदारी दिलीआहे.
भाजपने पुणे ग्रामीणसाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण बारामतीसाठी वासुदेव काळे आणि मावळसाठी शरदबुट्टे–पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बुट्टे–पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.