प्रचाराचा शेवट शंकर जगताप यांनी सांगवी, पिंपळेगुरव व पिंपळेनिलखमध्ये भेटीगाठी घेऊन केला

0

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सांगवी तसेच पिंपळेगुरवमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधून कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. पिंपळेगुरवच्या जनतेने एक लाखाचे मताधिक्य देण्याचे वचन अश्विनी लक्ष्मण जगताप यांना दिले. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेनिलखमध्ये पदयात्रा काढत प्रचाराची राळ उडवत शेवटचा दिवसही गाजवला. या पदयात्रेत तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पिंपळेनिलखच्या नागरिकांनी पदयात्रेचे जल्लोषात जंगी स्वागत केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात आजपर्यंत केलेल्या विकासकामाला मत द्या. त्यांची विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी बळ द्या, असे आवाहन दोघांनी मतदारांना केले.

भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. घरोघरी जाऊन त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद साधला आहे. प्रत्येक भागात त्यांनी पदयात्रा व कोपरा सभा घेत भाजपला साथ देण्याचे आवाहन केले आहे. प्रचारात प्रत्येक ठिकाणी त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतापर्यंत केलेल्या विकासाला मत द्या, असेच आवानह केले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी सांगवी, पिंपळेगुरवमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

पिंपळेगुरवमधील सुदर्शननगरमध्ये असलेल्या मशीदीत जाऊन त्यांनी मुस्लिम बांधव व भगिनींची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा आणि संवाद साधला. मुस्लिम महिला भगिनींनी त्यांचा सत्कार करत जंगी स्वागत केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे खऱ्या अर्थाने शहराचे विकासपुरूष होते. नागरिकांच्या भल्यासाठी विकासकामांचा अजेंडा राबवणारा त्यांचासारखा दुसरा नेता शहरात नाही. त्यांनी संपूर्ण पिंपळेगुरवचा कायापालट केला आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांबाबत कोणाच्याही मनात शंका नाहीत. त्यामुळे आम्ही फक्त भाजपलाच निवडून देणार असल्याचे मुस्लिम बांधव आणि भगिनींनी सांगितले. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला विजयी करून आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहणार असल्याचेही सांगण्यास मुस्लिम बांधव व भगिनी विसरले नाहीत.

माझ्या पतीने सर्वांच्याच भल्यासाठी कार्य केले. कोणाला कधीही काही कमी पडू दिले नाही. विकासकामे करून शहराला प्रगतीपथावर नेले. त्यांनी विकासाच्याच जोरावर शहरातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. आज पिंपळेगुरव आणि सांगवीसारखा भाग संपन्न परिसर म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुरू केलेले विकासाचे कार्य पुढेही चालू ठेवण्यासाठी प्रत्येक मतदाराने भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मतदारांना केले.

यावेळी माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंढे, जितेंद्र जवळकर, कमल शेख, फिरोज इनायत, शशिकांत दुधारे, अय्याज शेख, रमेश काशीद, बाबूलाल शेख, अनिस पठाण, बब्बू मुलाणी, राहुल जवळकर, साहिल शेख आदी उपस्थित होते.

चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी असलेले निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेनिलखमध्ये भव्य पदयात्रा काढली. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश करताच दुसऱ्याच दिवसांपासूनच ते अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारात सक्रिय झाले. शंकर जगताप यांच्या पदयात्रेला तरूणाईची उदंड गर्दी उसळली होती. कमळ फुलू दे च्या घोषणाबाजीने संपूर्ण पिंपळेनिलख दणाणून गेले होते.

शंकर जगताप यांनी घरोघरी नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठांचे आशिर्वाद घेतले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली विकासकामे नागरिकांना सांगितली. त्यांनी केलेल्या विकासाला एक मत देऊन भाजपला मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगसेवक विनायक गायकवाड, संदिप कस्पटेगणेश कस्पटे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, काळुराम नांदगुडे, नितीन इंगवले, भुलेश्वर नांदगुडे,फिंरगोजी कामठे, संतोष साठे, राजू साठे, लक्ष्मणराव दळवी, आनंद कुंभार, माऊली साठे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.