व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवार उद्या राष्ट्रपतींना भेटणार
व्हायरल पत्रावर शरद पवारांनी मौन सोडलं
मुंबई ः ”ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते पत्र थोडं नीट वाचलं असतं, तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांबाबत कोणतेही दुमत नाही. पण, आज जे तीन नवे कृषी विधेयक आणेल आहेत, त्यात याचा उल्लेख दिसत नाही”, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदा व्हायरल झालेल्या पत्राबद्दल मौन सोडलं.
शरद पवार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते, पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या बैठकीत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. शरद पवार पुढे म्हणाले की, ”विषय भरकटवण्यासाठी जुनं पत्र व्हायरल केलं जातं. याला जास्त महत्व देऊ नका”, असे सांगून ते पत्रकारांच्या पत्रासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाने परिषदेतून रागाने निघून गेले. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पवार उद्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.