मुंबई ः ”राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते स्वतंत्रपणे आपले विचार मांडतात. त्यांना निवडणुकांमध्ये यश आलं नसेल. मात्र, त्यांना पाठिंबा देणारा तरुणांचा वर्ग गेला आहे, असं मी मानणार नाही”, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मांडले.
१२ डिसेंबर वाढदिवसानिमित्त लोकमतने घेतलेल्या मुलाखतीत विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तर त्यांनी हे मत मांडले. सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरेंबद्दल तुमचं काय मत आहे, अशा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ”त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडा आभाव आहे. बराक ओबामा यांनी त्यांच्याबद्दलची मतं व्यक्त केली असतील. मात्र, सगळ्यांचीच मतं आपण मान्य केली पाहिजेत असंही नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाबाबतच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही”, असे मत शरद पवार यांनी राज ठाकरे आणि राहूल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत मांडले.