शरद पवारांवर देवेंद्र फडणवीसांनी साधला निशाणा

0

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. परंतु, दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने इंधन दरात कपात करत नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर देशातील काही राज्यांनी पेट्रोल-डिझोलच्या दरात कपात केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप दर कमी केलेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार कधी निर्णय घेणार? असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी केंद्राकडे बोट दाखवले. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेमुळे एन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांचे फटके फुटताना पहायला मिळत आहेत.

शरद पवार यांनी बारामतीमध्ये माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना जीएसटीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर  त्यांनी निशाणा साधला. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी त्यावर भाष्य केले. राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या विधानावर उलट निशाणा साधला. मी दुर्दैवाने म्हणतो की ज्यांना काही समजतच नाही, अशी मंडळी यात बोलत आहेत. जीएसटीची रक्कम मिळतेच आहे. गेल्या वर्षीही मिळाली, या वर्षीही मिळणार आहे. ती कुठेच जात नाही.पण केंद्राने 5 रुपये कर कमी केला की आपोआप 7 रुपये टॅक्स कमी होतो. आमचं म्हणणय तो 10 ते 12 रुपये करा, असं फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असे म्हटले आहे. परंतु केंद्र स

Leave A Reply

Your email address will not be published.