शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी (दि. 28) रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

शरद पवार यांना रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तपासणीनंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे. पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याने दोन दिवस त्यांची औषधे बंद केली आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बुधवारी (दि. 31) अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. पण प्रकृती अस्वस्थेमुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द केल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.