दहा वर्षात 24 रुपयांवरून 2100 रुपयावर ‘या’ कंपनीचा शेयर

0

नवी दिल्ली : ऑटो सेक्टर वगळता सर्व सेक्टरमध्ये तेजी असल्याने सेन्सेक्स 24 सप्टेंबर 2021 ला 60,000 चे शिखर पार करून पुढे गेला. आज म्हणजे सोमवारी सुद्धा चढ-उतारदरम्यान 60 हजार अंकावर कायम आहे. सेन्सेक्समध्ये 10,000 अंकाची वाढ केवळ 8 महिन्यात झाली आहे. या 8 महिन्यात एकुण 42 स्टॉक असे होते ज्यांनी जबरदस्त रिटर्न दिला.

मात्र, काही स्टॉक असे सुद्धा आहेत, ज्यांनी 2021 मध्ये 100 टक्केपेक्षा कमी रिटर्न दिला आहे. परंतु मोठ्या कालावधीत, या शेयरने शेयरधारकांना (Stock Market) मालामाल केले आहे. ज्यामध्ये एस्ट्रल लिमिटेड (Astral Limited) च्या शेयरचा समावेश आहे. मागील 10 वर्षात एस्ट्रल शेयरची किंमत 23.82 रुपये प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 2145 रुपये झाली आहे. आज दुपारपर्यंत जवळपास एकुण 8900 टक्के रिटर्न दिला आहे.

– या मल्टीबॅगर स्टॉकच्या शेयर प्राईस हिस्ट्रीनुसार, हा मागील एक महिन्यात 1982.05 प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 2145 च्या स्तरावर पोहचला. या कालावधीमध्ये जवळपास 8 टक्केची वाढ झाली.

– मागील सहा महिन्यात एस्ट्रल शेयरची किंमत 1591.65 रुपये प्रति स्टॉक स्तरावरून वाढून 2145 रुपये झाली.
मागील 6 महिन्यात जवळपास 35 टक्केची वाढ नोंदली गेली.

– अशाच प्रकारे, मागील एक वर्षात, एस्ट्रल शेयरची किंमत 850.95 रुपयांवरून वाढून 2145 रुपये प्रति शेयर झाली.
या दरम्यान कंपनीच्या शेयरमध्ये 152 टक्केची तेजी दिसून आली.

– मागील 5 वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक 263.73 वरून वाढून 2145 रुपये झाला या कालावधीत 680 टक्के रिटर्न नोंदला गेला.

अशाप्रकारे, हा मल्टीबॅगर स्टॉक 23.82 प्रति शेयरच्या स्तरावरून वाढून 2145 रुपये प्रति इक्विटी मार्क झाला
या कालावधीत जवळपास 8900 टक्केपर्यंत वाढला आहे.

एस्ट्रल शेयर प्राइस हिस्ट्री पाहिली तर एखाद्या गुंतवणुकदाराने एक महिना अगोदर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणुक केली असती तर त्याच्या 1 लाख रुपयांचे 1.08 लाख झाले असते.
जर गुंतवणुकदाराने 6 महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 1.35 लाख झाले असते.

अशाच प्रकारे, जर गुंतवणुकदारोन एक वर्षापूर्वी या शेयरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ते आज 2.52 लाख झाले असते.
मात्र, जर एखाद्या गुंतवणुकदाराने 5 वर्षापूर्वी या काऊंटरमध्ये 1 लाखाची गुंतवणुक केली असती,
तर या दरम्यान रिटर्न 8.13 लाख झाला असता.

अशाप्रकारे एखाद्या गुंतवणुकदाराने 10 वर्षापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 23.82 प्रति शेयरवर 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मुल्य 90 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

Leave A Reply

Your email address will not be published.