‘ती’ ऑफर देत तरुणींनी उकळले 18 लाख

0

पुणे : सेक्स सर्वीस देण्याचे आमिष दाखवून दोन तरुण मुलींनी एका 44 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून तब्बल 18 लाख रुपये उकळले आहेत. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या व्यक्तीला दोन तरुणींनी समाजातबदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 18 लाख रुपये उकळले. 29 मार्च ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत ही घटना घडलीआहे.

वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्याने या व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, वेगवेगळ्या 6 मोबाईलधारक महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील एका उच्चभ्रूसोसायटीत फिर्यादी राहण्यासाठी आहेत. एका इन्शुरन्स कंपनीचे काम करतात.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात तरुणीने फोन केला. त्यांनाहॉर्नी डेटया कंपनीतून बोलत असून, तुम्हाला आम्हीसेक्स सर्व्हिस (सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईड) पुरवू अशी बतावणी केली. तसेच, त्यांना यासाठी कंपनीचा मेंबर होण्यास सांगितले. तक्रारदारांनी 800 रुपये भरून मेंबरशीप घेतली. त्यानंतर त्यांना काही मुलींचे फोटो पाठविले त्यापैकी दोन मुली निवडण्याससांगितल्या. त्यांनी दोन मुली निवडल्यानंतर प्रत्येकीचे 21 लाख रुपये भरण्यास भाग पाडले.

त्यानंतर या मुलींशी त्यांचे बोलणे सुरू झाले. परंतु, काही तासांनीच या मुलींनी त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तुमचीबदनामी करू तसेच तुमचे फोटो इतर माहिती सोशल मिडीयावर व्हायरल करू अशी धमकी देत त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख ३७हजार रुपये बँक खात्यावर घेतले. सतत पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी शेवटी पोलीसांकडे तक्रार दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.