मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 व्या वयातही एखाद्या तरुणालाही लाजवतील अश्या प्रकारचा ‘फिट’ आहेत. त्यांच्या या वयातील तंदुरुस्ती मागे व्यायामांसह सर्वात महत्वाचा आहे त्यांचा आहार आणि त्याच्या आहारात असणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘शेवगा’ हा आहे.
फिट इंडिया अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शेवग्याच्या पराठाचा उल्लेख केला होता. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य उघड करत सांगितले की, आठवड्यातून किमान दोनदा शेवग्याच्या शेंगाचे पराठे खायला हवेत.
शेवग्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. तसेच, त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे पेशी खराब होण्यापासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. या व्यतिरिक्त, शेवगा सांधेदुखी, लठ्ठपणा, दमा, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, मायग्रेन, पोटाच्या समस्या आणि सर्व आजारांपासून आराम देते आणि आपले संरक्षण करते.
डोळ्याच्या आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून शेवगा आपले संरक्षण करते. शेवग्याच्या शेंगेच्या सेवनामुळे प्रसूती दरम्यान जास्त वेदना होत नाहीत. म्हणजेच, फक्त या एका गोष्टीचे सेवन केल्याने सर्व आजारांपासून तुमचे रक्षण होऊ शकते. शेवग्याचा उपयोग केवळ पराठा बनवण्यासाठीच केला जात नाही तर त्याचे इतरही अनेक पदार्थ तयार करता येतात.
शेवग्या पासून पराठे, शेवगा फुलांची भाजी, भजी असे अनेक प्रकार करता येतात. शेवगा पानांपासून पराठा, फुलांपासून भाजी, शेवगा शेंग उकडून भजी करता येतात. झटपट होणाऱ्या या सर्व पदार्थ अनेक प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात.