पिंपरी : रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळासंदर्भात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या मध्ये रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, भविष्यासाठी उदरनिर्वाह, म्हातारपणी पेन्शन, अपघाती विमा अशा विविध प्रकारच्या सुविधा त्यामध्ये असाव्यात. ही मागणी केल्या 25 ते 30 वर्षापासून रिक्षा चालक मालकांनी सातत्याने लावून देण्यात आले आहे. कल्याणकारी मंडळ संदर्भात अनेक मेळावे, आंदोलने झाले.
कल्याणकारी मंडळ हे तामिळनाडू धरतीवर असावे किंवा महाराष्ट्र मध्ये स्वतंत्र असावे संदर्भामध्ये सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत भूमिकेला पाठिंबा देण्यासंदर्भामध्ये रिक्षा संघटनामध्ये फूट पडली. यातून डॉ. बाबा आढाव व शरद राव असे दोन गट निर्माण झाले. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे घेण्यात आले. रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत फक्त रिक्षा चालकांचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ असावे अशी भूमिका स्वर्गीय शरदरा यांनी वेळोवेळी मांडली आहे, व सरकार दरबारी पाठपुरवठा केला आहे, परंतु कल्याणकारी महामंडळ मात्र अद्याप झाले नाही. आता शिंदे ,सरकार. यांनी रिक्षाचालकांन साठी कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे रिक्षा चालक मालकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणे संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली आहे.