उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

0

पुणे : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर आक्रमक शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. यामध्ये उदय सामंतांची गाडी ही फोडण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आणि पुणे पोलिसांच्या सुरक्षेत जात असताना हा हल्ला झालेला आहे.

शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराकडे जाताना हा प्रकार घडलेला आहे. सभा संपल्यानंतर कात्रज चौकात अवघ्या काही मिनिटात शिवसैनिकांनी हा हल्ला चढवलेला आहे. तर यावेळी गद्दारी केली म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे.

याच चौकात आदित्य ठाकरे यांची काही वेळापूर्वी सभा संपली होती. आदित्य ठाकरे हे तेथून निघून गेले होते. मात्र शिवसैनिक मोठ्या संख्येने होते. सामंत यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी करत गाडीची काच फोडण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.