शिवसेनेने विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं ठरलं होत : अमित शाह

एक बूथ अध्यक्ष हा सर्वात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनतो हे फक्त bJP मध्येच घडते

0

पुणे : 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो, शिवसेनेशी मीच बोललो होतो. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री  होणार हे ठरलं होतं. पण शिवसेना पलटली. मी खोटं बोललो म्हणतात ठीक आहे, ते मान्य आहे. पण तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला, हिंदुत्व सोडलं, अशा शब्दांत केंद्र गृहमंत्री अमित शहा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. अमित शहा पुण्यातील भाजप बूथ कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.

अमित शाह पुढे म्हणाले, ही तीन चाकी रिक्षा बंद पडली आहे. चाकात हवा नाही. या सरकारच्या हातात राज्य कसं चालेल? हे नक्कामी सरकार आहे. शिवसेना म्हणते ‘सत्ता मेरा जन्मसिद्ध अधिकार किसी भी तरह लेकर रहेंगे’. तुम्हाला आव्हान आहे, निवडणुकीला सामोर जा, तिघांविरोधात लढा. मग बघा तरी काय अवस्था होते, असं थेट आव्हानच शाह यांनी शिवसेनेला दिलं आहे.

यांना ऐकायला अडचण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल स्वस्त करायला सांगितलं यांनी दारु स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकार उत्तर द्या, हे वसुली सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बूथ कार्यकर्ता म्हणून केली. साबरमती विधानसभेचा 1981 चा बूथ कार्यकर्ता होतो. ही एकमेव पार्टी जिथे बूथचा अध्यक्ष पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. अनेकदा हातात बोचनाऱ्या थंडीत कमळ रंगवलं. सतरंज्या टाकल्या पण अध्यक्ष म्हणून निवडताना असं कुणी म्हटलं नाही. 1950 मध्ये जनसंघाच्या जन्माच्या वेळी काय झालं. 70 वर्षात जगातलं सगळ्यात मोठी राजकीय संघटना आहे. जिथे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं तिथे सरकार आली. प्रत्येक मतदारासमोर जाताना छाती मोठी करुन जा तुमच्या नेतृत्वाने कुठलही चुकीचं काम केलेलं नाही, अस शाह यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.