पुणे : शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांचा मुलगा निखील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून खडक पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी हॉस्पीटलकडे धाव घेतली आहे.
निखील बाळासाहेब मालुसरे (28, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, 1053 शुक्रवार पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत खडक पोलिसांकडे केईएम हॉस्पीटलकडून खबर प्राप्त झाली आहे. हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात कळविले आहे. निखील यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यानंतर तातडीने त्यास केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले.
बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबतची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचं खडक पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत खडक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.