मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व; अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार

0

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेत मोठा धक्का बसलाय. कारण मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरुन प्रवीण दरेकर यांना पायउतार व्हावं लागणार आहे. मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरुन बाजूला केलं आहे. तर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी आज सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली. तसंच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचंही समजतं.

दरम्यान, दरेकर यांनी म्हटले  ‘त्याठिकाणी आम्ही एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यावेळी पक्षाचा अभिनिवेश नव्हता. पक्षाची पादत्राणं बाजूला ठेवून ही निवडणूक लढली गेली. मी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे ठरवून त्याठिकाणी जे निवडणुकीत ठरलं होतं की राजकारण विरहित सगळ्यांनी एकत्र काम करायचं त्याला धक्का दिला गेलाय. एकत्रितपणे आम्ही बँक चालवत होतो. सहकारात हे होत राहतं. बँकेच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करत राहू. सगळ्या विजयी उमेदवारांचं मी अभिनंदन करतो’,

मुंबई बँकेवर कोणत्या पक्षाचे किती संचालक?

भाजप संचालक

• प्रवीण दरेकर

• प्रसाद लाड

• विठ्ठल भोसले

• आनंद गाड

• कविता देशमुख

• विनोद बोरसे

• सरोद पटेल

• नितीन बनकर

• अनिल गजरे

राष्ट्रवादी काँग्रेस संचालक

>> संदीप घनदाट
>> शिवाजीराव नलावडे
>> पुरुषोत्तम दळवी
>> विष्णू गंमरे
>> सिद्धार्थ कांबळे
>> जयश्री पांचाळ
>> नंदू काटकर
>> जिजाबा पखर

शिवसेना संचालक

• सुनील राऊत

• अभिषेक घोसाळकर

• शिल्पा सरपोतदार

मुंबई बँकेत शिवसेना राष्ट्रवादीचं गणित कसं जुळणार?

>> शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस = 11 संचालक

>> भाजप = 9 संचालक

Leave A Reply

Your email address will not be published.