”त्यांची खुमखुमी चांगलीच जिरली”

शिवसेनेने चंद्रकांत पाटलांच्यावर साधला निशाणा

0

मुंबई ः महाविकास आघाडीला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला, तर महत्प्रयासाने भाजपाच्या वाट्याला केवळ एक जागा मिळाली. त्यावरून शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच शाब्दीक वार केलेला आहे.

अग्रलेखात म्हंटलं आहे की, ”आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. पण, आम्ही सर्वशक्तीमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार हीखुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली”, असा वाक्बाण शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्यावर सोडला.

”काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी एकत्र लढली, यापेक्षा एकदिलाने लढली हे जास्त महत्वाचे. भाजप-शिवसेना एकत्र लढत होते तेव्हा शिवसेनेची टांग खेचण्यासाठी. जागोजागी बंडखोर उभे करून भाजपा खेळ बिघडवत होता. आता तिघांत तसे झाले नाही. यापासून धडा घ्यायचा तो भाजपाने”, असेही शिवसेनेने म्हंटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.