महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत याचा निर्णय शिवसेना पुढील 25 वर्षे घेईल

0
मुंबई : महाराष्ट्रात आघाडी सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवण्यासाठी सर्व ननेत्यांद्वारे प्रयत्न केले जात असले, तरी पक्षांच्या नेत्यांमध्ये संघर्ष दिसत आहे. रविवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन महत्त्वाच्या पक्षांमधे संघर्ष तीव्र झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली असे म्हटले होते. यावरुन मोठा वाद सुरु झाला आणि आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवत आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला महत्त्वाचा संदेश दिला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत याचा निर्णय शिवसेनेने घेतला आणि पुढील २५ वर्षे हे असेच सुरू राहील, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रविवारी सकाळी कोल्हे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
त्याआधी मुख्यमंत्र्यांशी असलेल्या संबंधाबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, “मी संसदेत नेहमीच महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न उपस्थित केले आहेत आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीही माझे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला पूर्ण आदर आहे आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर कोल्हे आता माघार घेत आहेत, असेही आढळराव म्हणाले. “माझ्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत असे वक्तव्य मान्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. आणि म्हणूनच त्यांनी (कोल्हे) आता माघार घेत आहेत, ”असे आढळराव म्हणाले.
रविवारी शिवाजीराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार हे शिवसेनेने ठरवले असून येत्या २५ वर्षातही शिवसेनाच याबाबत निर्णय घेईल. खेड व नारायणगाव बायपासच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी टीका केल्यानंतर शिवसेनेतर्फे प्रतिक्रिया देण्यात आली,. शिवसेनेच्या प्रत्युतरानंतर राष्ट्रवादीचे खासदार कोल्हेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला पूर्ण आदर आहे आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.”
शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयांवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत संघर्ष उफाळून आला आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली असून, आता एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरू झाल्याचे दिसत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.